साहित्य हे स्त्रीचं जगणं, तिची अभिव्यक्ती, तिनं कुंठित झालेल्या जगण्याच्या प्रवाहाला वाट काढून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा अम्लान, रसरशीत आविष्कार आपल्याला दाखवत राहतं…
या सगळ्या मांडणीतून मला इतिहास शिकणारी बाई म्हणून काय सांगायचंय? तर आमच्याकडे डोळे दिपवणारा भूतकाळ असेल किंवा नसेल, पण तरी आम्ही आमची कहाणी, आमचा इतिहास सांगायला हरकत नाही. बायकांच्या जगण्याचा प्रवाह खळाळत राहिला आहे. त्याची ओल आपल्या साहित्याच्या पानापानांत पोचलेली आहे. तिची दखल इतिहासानं घ्यायला हरकत नाही.......